ऑनलाईन टीम / मुंबई :
गुगल नेहमीच खास डूडलद्वारे वेगवेगळे संदेश, सणांचे सेलिब्रेशन तसेच मोठ्या लोकांप्रती आदरभाव प्रकट करत असते. आज देखील गुगलने एक खास डूडल बनवले आहे. आज 20 मार्चपासून उत्तर गोलार्धात वसंत ऋतू सुरु झाला आहे. वसंत ऋतू 21 जूनपर्यंत कायम असतो. हा काळ फुलांचा हंगाम म्हणूनही ओळखला जातो. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी गुगलने भन्नाट रंगीबेरंगी डूडल साकारले आहे.
वसंत ऋतू् हा सर्वात चांगला ऋतू मानला जातो. उत्तर गोलार्धात झाडं, फुलांना नवीन पालवी फुटण्याचा हा हंगाम असतो. याच वसंत ऋतूतील भावना गुगलच्या या डूडल द्वारे प्रकट होत आहेत. फुलेे, मधमाशा आणि हेजहॉग यांनी हे डुडल साकारण्यात आले आहे. डुडलमध्ये हेजहॉग सुंदर रंगीबेरंगी फुलांनी नटलेला दिसत आहे.
दरम्यान, आजच्या दिवसाला ‘Spring Equinox’ असेही म्हणतात. वसंत ऋतूतील आजचा पहिला दिवस असून सूर्य आज दक्षिणेकडून उत्तरेकडील गोलार्धकडे जात विषुववृत्त ओलांडतो.