स्थानिक वक्त्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
वसंत व्याख्यानमालेची बैठक शुक्रवारी संध्याकाळी स्वरुपा इनामदार यांच्या निवासस्थानी झाली. अध्यक्षस्थानी व्याख्यानमालेच्या अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर होत्या. प्रारंभी अशोक याळगी, एस. पी. उपाध्ये व आशा मनोहर यांच्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरवषी वसंत व्याख्यानमालेसाठी बाहेर गावातील नामवंत वक्त्यांना निमंत्रित करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाचे संकट पूर्णतः टळले नसल्याने स्थानिक वक्त्यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिलमध्ये पाच दिवस ही व्याख्यानमाला होईल. त्याचप्रमाणे संस्कार वर्गासाठी वक्ते ठरवून त्यांना निमंत्रण देण्याचे ठरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य भाषा विकासच्या पुढाकाराने मार्चमध्ये दोन कार्यक्रम घेण्याचे ठरले. याअंतर्गत प्रा. माधुरी शानभाग यांचे व्याख्यान होणार आहे. महिलांसाठी लेखन कार्यशाळा होणार आहेत. बैठकीला सुमन रानडे, प्रियांका केळकर, विजया पुजारी, सुनीता देशपांडे, दीपा देशपांडे, नमिता कुरुंदवाड आदी उपस्थित होत्या.