वसगडे/प्रतिनिधी
वसगडे – सांगली मार्गावर वसगडे ता.पलूस येथील विकास साेसायटीच्या मागील बाजुस ऑल्टो कार रस्ता साेडुन घसरली. सदरची घटना बुधवारी सायकाळी चारच्या दरम्यान घडली.
येरळा नदी पुल ओलांडल्यानंतर वळणावर सांगली हुन पलूस कडे जाणार्या अल्टाे कार वरील ताबा सुटल्याने कार साधारणतः दहा फुट खाली घसरली. कारचालक किरकाेळ जखमी झाला असुन काेणतीही जिवितहानी झाली नाही. झाडी झुडपा मध्ये कार अडकल्याने माेठी दुर्घटना टळली.
वसगडे- नांद्रे दरम्यान येरळा नदीवरील पुलाच्या नांद्रे कडील बाजुच्या पश्चिम दिशेचा भराव ढासळल्याने पुल धाेका दायक बनल्याने असाच अपघात हाेण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या दाेन्ही बाजुच्या संरक्षक पाईप निघाल्याने पुला पासुन ते वसगडे बसस्थानक पर्यंत रस्ता धाेकादायक बनला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने संरक्षक पाईप साठी निधी मंजुर केल्याचे समजते पण अद्याप काम सुरु नाही. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.