वाई / प्रतिनिधी :
वाई तालुका व शहरामध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळेत चालू आहेत. इतर सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे बऱ्याच कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. वाई तालुका व शहरातील सर्व प्रकारची दुकाने व हॉटेल्स कोरोनाचे नियम पाळून पूर्ण वेळ उघडण्याची परवानगी मिळण्यासाठी वाई तालुका मनसेच्या वतीने मा तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. मात्र ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या विरोधात वाई म.न.सेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मयुर नळ, वाई तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, वाई शहर अध्यक्ष विश्वास सोनावणे, वाई तालुका अध्यक्ष वाहतूक सेना गलुरदार सणस, वाई पश्चिम विभाग अध्यक्ष दिपक मांढरे आदी उपस्थित होते.