प्रतिनिधी/ वाई
वाई शहरासह तालुक्यातील गावांन मध्ये कोरोनो रोगाने थैमान घालु नये या साठी खबरदारीचा ऊपाय म्हणुन वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाईच्या किसनवीर चौकात विना मास्क फिरणारे. समांतर अंतर न ठेवणे .वाहन चालवताना मोबाईल वर बोलणे प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे ऊलंघन करणार्या नागरिकांन वर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिस कर्मचार्यांना दिल्याने किसनवीर चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते
या वेळी मास्क न लावता फिरणार्या 48 नाकरीकांन वर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्या कडुन 9 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर 24 चारचाकी आणी दुचाकी वाहन चालकांन वर केलेल्या दंडात्मक कारवाईत 6 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असा ऐकुन 15 हजार 600 रुपयांचा महसूल गोळा झाला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली …
या धडाकेबाज सुरु असलेल्या कारवाई मुळे नियमांचे ऊलंघन करणार्या वाहन चालकांनसह पादचार्यान मध्ये खळबळ ऊडाली आहे. गणपती आणी गौराई सणाच्या खरेदी साठी वाई तालुक्यातील नागरीकांनसह महिलांची वाई शहरात मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने या झालेल्या गर्दीत अनेकांनी मास्कचा वापर न करता मोकाट फिरताना पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या निदर्शनात आल्याने हि गर्दी नक्कीच कोरोनो रोगाला आमंत्रण देऊ शकते आणी त्याचा फैलाव संपूर्ण वाई तालुक्यातील गावांन मध्ये होऊन त्यातुन कोरोनो पॉझिटीव्ह रुग्ण संख्या वाढु शकते तो रोखण्या साठीच पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाई शहराचा केंद्र बिंदु असलेल्या किसनवीर चौकात नियमांचे ऊलंघन करणार्या दुचाकी चारचाकी व पादचारी यांच्या वर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे या किसनवीर चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.