प्रतिनिधी/ सातारा
नवरात्रीच्या पवित्र सणाचे औचित्य साधून भाजपा वाई शहर महिलांनी नवदुर्गा सत्कार उपक्रमाद्वारे नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज एका सन्माननीय महिलेला भेटून की ज्यांनी समाजामध्ये आपले कर्तृत्व दाखवून एक वेगळा ठसा उमटवला आहे अशा महिलांचा आदर सत्कार करण्याचे नियोजन केले आहे. दि. 17 रोजी आदिशक्तीचा जागर करताना व स्त्रियांच्या कर्तुत्वाला नमन करताना वाईतील जेष्ठ मार्गदर्शिका श्रीमती विजयाताई भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. दि. 18 रोजी आदिशक्तीचा जागर करताना व स्त्रियांच्या कर्तुत्वाला नमन करताना वाईतील माजी भाजपाच्या नगरसेविका आणि माजी शिक्षिका सौ. मिनलताई ईनामदार यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजपाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.