प्रतिनिधी/ वाई
आज दिनांक 30/12/2019 रोजी श्री. रोहित कक्कर, सल्लागार ण्झ्प्Eिंध्, गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालय यांनी वाई शहरातील मैला व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी वाई शहरातील मैला प्रक्रिया प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहिले व टाईड टेक्नोक्रॅट्सचे श्री. राजकिरण अमरावथी आणि वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. शहरामधुन नदी वाहत असल्याकारणाने नदीमध्ये मिसळणाया सांडपाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी गणपती घाटाची पाहणी करून तेथील काही नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी स्वच्छता विषयक कामांबद्दल समाधान व्यक्त केल्याने त्यांनी पदाधिकायांचे अभिनंदन केले. तसेच शहरामध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारणेबाबत पदाधिकारी व अधिकारी यांचेसोबत चर्चा केली.
वाई दि. 30/12/2019 वाई शहर स्वच्छ व हागणदारी मुक्त होण्यासाठी वाई नगरपरिषद सदैव कार्यरत आहे. वाईकरांसाठी अभिमानाची बाब अशी की, सेप्ट विद्यापीठ आणि टाईड टेक्नोक्रॅट्स यांच्या मदतीने आणि बिल व मिलिंडा गेट्स फौंडेशन यांच्या अनुदानातून वाई नगरपरिषद मैला प्रक्रिया प्रकल्प व कालबद्ध रीतीने शौच टाक्या उपसणे हे काम यशस्वीपणे राबवीत आहे. वाई शहरातील या स्तुत्य उपक्रमाला भेट देण्यासाठी देशी तसेच परदेशी पाहुणे आवर्जुन येत असतात. भारतातील प्रायोगिक तत्वावरील या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेले श्री. रोहित कक्कर यांचे वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, नगरसेवक व कर्मचारी यांनी स्वागत केले.
श्री. रोहित कक्कर यांनी वाई शहरामध्ये चालू असलेल्या स्वच्छतेविषयक, घनकचराविषयक आणि मैलापाणी व्यवस्थापन विषयक कामाच्या बाबतीत समाधान व्यक्त करून सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. त्यावेळी बोलताना ‘वाई हे मैलापाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यामध्ये अतिशय चांगले काम करत असून देशातील इतर शहरांसाठी ते दिपस्तंभ ठरेल’ असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा यांनी शहराला सांडपाणी प्रकल्पासाठी शासनाच्या विशेष सहाय्याची गरज असल्याचे नमूद करून त्यासाठी केंर्द्स्तरावरून नगरपरिषदेला मदत करण्याची विनंती केली. तसेच वाई स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करेल अशी ग्वाही देऊन त्यांनी सर्वांचे आभार मानले. वाई शहराचा गौरव असलेल्या गणपती घाटाची फोटोप्रेम, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी वाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभा शिंदे, नगरसेवक श्री. किशोर बागुल, श्री. भारत खामकर, श्री. महेंद्र धनवे, श्री. सतीश वैराट, कार्यालय निरीक्षक श्री. नारायण गोसावी, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता क्रांती वाघमळे, आरोग्य निरीक्षक श्री. गुणवंत खोपडे, नियोजन सहाय्यक श्री. निनाद जगताप, बांधकाम अधिकारी श्री. जितेंद्र वंजारी व नितिन टापरे, सेप्ट विद्यापीठाचे प्रतिनिधी भूषण टवलारे, जीनल छेडा तसेच टाईड टेक्नोक्रॅट्सचे श्री. राजकिरण अमरावथी व स्नेहल भोसले उपस्थित होते.