पुराण संशोधक शास्त्रज्ञांना अभ्यासाची संधी- १९४४ पूर्वींची नाणी सापडली
वाकरे / प्रा.एस.पी.चौगले
वाकरे ता.करवीर येथील ऐतिहासिक गाव तलावाचे उत्खनन सुरू असून गाव या तलावाच्या उत्खननात अनेक ऐतिहासिक बाबींचा उलगडा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुराण संशोधक शास्त्रज्ञांना या तलावाचे संशोधन करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या तलावात १९४४ पूर्वीची ब्रिटिशकालीन काही नाणी सापडली आहेत.
या तलावाची अधिक माहिती अशी की वाकरे गावाच्या दक्षिण दिशेला भोगावती नदीच्या अलीकडे गाव गाव तलाव आहे. या गाव तलावाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. एकूण दीड एकर क्षेत्रात हा तलाव पसरलेला आहे. कदाचित पूर्वीच्या काळात या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असावे.वाकरे ग्रामपंचायतीने यापूर्वी तीन वेळा या तलावातील गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे तीनही वेळा हे प्रयत्न अपयशी ठरले होते.
अलीकडे गावचे लोकनियुक्त सरपंच वसंत तोडकर,उपसरपंच शारदा पाटील व सर्व सदस्यांनी दोन महिन्यापूर्वी गाव तलावातील गाळ काढण्याचे ठरवले. तलावातील गाळ काढणे सोपे काम नव्हते. मात्र त्यांनी धाडसाने या गाव तलावातील गाळ काढण्याचे ठरवले. सुरुवातीला दोन-तीन जेसीबी मशीन घेऊन तलावातील गाळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र हे काम इतके अवघड होते, की जेसीबी मशीनसुद्धा अपुरी पडू लागली. त्यामुळे यावर्षी पुन्हा हे कामा अपुरे राहणार की काय ?अशी अशी शंका वाटू लागली. मात्र आठ -दहा दिवसापूर्वी साबळेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील यांनी आपला जेसीबी विनामूल्य गाळ काढण्यासाठी दिला आणि सुमारे दहा दिवसांच्या प्रयत्नातून हे काम पार पडल.