कलाकारांचे चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी अनेक गोष्टी करतात. कधी त्यांच्यासाठी भेटवस्तू पाठवतात, तर कधी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या सेटवर जातात. असेच काहीसे अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत घडले आहे. जान्हवीचा एक चाहता तिला भेटण्यासाठी राजस्थानहून मुंबईत आला होता. मात्र जान्हवीने त्याला चांगली वागणूक दिली नसल्याचे म्हणत नेटकऱयांनी तिला ट्रोल केले आहे. जान्हवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
वर्कआउट केल्यावर जान्हवी पायलेट्स स्टुडिओमधून बाहेर आली. गेटच्या बाहेर तिचा एक चाहता तिची वाट बघत होता. जान्हवीच्या सूचनेनंतर सुरक्षारक्षकाने या चाहत्याला आत सोडले. चाहत्यासोबत छायाचित्रे काढून घेत जान्हवीने त्याने आणलेली भेटवस्तूही स्वीकारली. पण ही भेटवस्तू तिथेच ठेवून ती कारमधून निघून गेल्याने नेटकऱयांचा संताप झाला आहे.