प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोने व १० हजार रोकड असे ३५ हजाराचे ऐवज चोरट्याने लंपास केले आहे. ही घटना दि ४ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान वागदरी येथे घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वागदरी येथील शांताबाई सोमण्णा भैरामडगी वय ६५ या आपल्या घरात झोपलेले असताना संशयीत आरोपी बसू राघलू पवार रा वागदरी यांनी फिर्यादीचा दरवाजा ढकलून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व खुंटीला अडकवलेल्या शर्टाच्या खिशातील १० हजार रुपये शिताफीने लंपास करीत फिर्यादीच्या छातीवर पाय ठेवून आरडाओरडा केल्यास इथेच जीव मारून टाकतो अशी धमकी देत चोरी केली म्हणून फिर्यादी शांताबाई सोमण्णा भैरामडगी यांनी संशयित आरोपी बसू राघलू पवार रा वागदरी याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.