सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया’ कुटुंबांमधील अतूट नात्याला सादर करणाऱया साध्या, पण संबंधित कथानकासह प्रेक्षकांची मने जिंकत आहे.मालिकेने कुटुंब आपल्या जीवनामध्ये आणू शकणाऱया साध्या आनंदांना सादर करणे सुरूच ठेवले आहे. भारताचे सर्वात लोकप्रिय कुटुंब ‘वागले परिवारा’चा महत्त्वपूर्ण भाग असलेले टेलिव्हिजनवरील प्रेमळ जोडपे सुमीत राघवन (राजेश वागले) आणि परिवा प्रणती (वंदना वागले) यांनी त्यांच्या सुखी कुटुंबामागील गुजगोष्टी सांगितल्या.
वंदना वागलेची भूमिका साकारणाऱया परिवा प्रणती म्हणाल्या, ’ कधी-कधी आम्ही पूल गेम देखील खेळतो. आम्ही सुमीतच्या रूममध्ये जाऊन संगीतमय क्षणांचा आनंद घेतो. त्याच्याकडे हार्मोनियम आहे आणि आम्ही एकत्र गायनाचा आनंद घेतो. आगामी एपिसोड्समध्ये वागले परिवार अगर हा मजेशीर खेळ खेळताना पाहायला मिळणार आहे. मला खात्री आहे की आम्ही यासाठी शूटिंग करताना जितकी धमाल केली, तितकेच प्रेक्षक ते पाहण्याचा आनंद घेतील.’’ राजेश वागलेची भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्हणाले, ’सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नियमांचे पालन करत
आम्ही पॅकअपनंतर हौजी व इतर मजेशीर खेळांचा आनंद घेतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकत्र वेळ व्यतित करत असल्यामुळे आमच्यामधील नाते अधिक दृढ होत आहे, यामुळे आम्हाला कंटाळवाणे न वाटता सतत पुढे जाण्यास प्रोत्साहन देखील मिळते.’’
सखी वागलेची भूमिका साकारणारी चिन्मयी म्हणाली, ’खेळ हा एकत्र येण्याचा उत्तम मार्ग आहे. हे आमच्या कुटुंबाच्या बाबतीत अगदी खरे आहे. सर्व कलाकार व टीम सेटवर बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि इतर खेळ खेळण्याचा आनंद घेतात.