स्कॉटलंडमधील अजब परंपरा
विवाहाच्या परंपरा बहुतांश समाजात दिसून येतात. विवाहापूर्वी वधूला मोठय़ा प्रमाणात सजविण्यात येते. वधू सुंदर दिसावी म्हणून अनेक दिवसांपासून तिची विशेष काळजी घेतली जाते. परंतु स्टॉकलंडमध्ये अशी प्रथा आहे, जी ऐकून तुम्ही चकित व्हाल. स्कॉटलंडमध्ये काही गावांमध्ये विवाहापूर्वी नियोजित वधूवर चिखलाचा मारा केला जातो. या प्रथेवर वधूवर अनेक प्रकारच्या गलिच्छ गोष्टी फेकल्या जातात. काही ठिकाणी वधू-वरावर विवाहापूर्वी चिखलाचा मारा केला जातो, तर काही ठिकाणी अंडी फेकली जातात.
वधू आणि वराला कचऱयाने न्हाऊ घालण्याच्या या प्रथेला ब्लॅकनिंग दी ब्राइड या नावाने ओळखले जाते. स्कॉटलंडच्या उत्तरपश्चिम भागातील अनेक गावात ही परंपरा दिसून येते. यात विशेषकरून काळय़ा रंगाची शाई वधूवराला फासली जाते. स्कॉटलंडच्या या गावांमध्ये वधूवर फेकला जाणारा कचरा, काळा रंग, काळी शाई, अंडी, नासलेले अन्न आणि इतर गोष्टींना गुड लकचे साइन (शुभचिन्ह) मानले जाते.
या प्रथेनंतर जेव्हा युवक आणि युवती वैवाहिक जीवनात प्रवेश करतात, तेव्हा त्यांचे पुढील जीवन आनंदी होत असल्याची मान्यता आहे. स्कॉटलंडमध्ये होणाऱया या प्रथेचा एक संदेश देखील आहे, विवाह हा गुलाबाप्रमाणे सुंदर नाही, तर त्यात अनेक प्रकारच्या अडचणीही येतात आणि दोघांना मिळून या समस्यांवर मात करावी लागते.
या प्रथेची सुरुवात 19 व्या शतकात झाली, तेव्हा महिलांच्या पायांना विवाहादरम्यान साफ करण्यासाठी चुलीतून निघणाऱया अवशेषांचा वापर केला जात होता. 20 व्या शतकात हा प्रकार एका मजेशीर प्रथेत रुपांतरित झाला, ज्यात वधू आणि वर दोघांवरही कचरा फेकला जाऊ लागल्याचे युनिव्हर्सिटी ऑफ एबर्दीनच्या एका संशोधकाने सांगितले आहे.