वारणानगर / प्रतिनिधी
वाघबीळ (ता पन्हाळा) घाटात ट़्कच्या चाकाखाली दुचाकीस्वार सापडल्याने त्याच्या पायासह इतरत्र मोठ्या प्रमाणावर दुःखापत होऊन तो गंभीर जखमी झाला असून ट्रकचालक पसार झाला आहे.
या अपघाताची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करणेत आली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलीसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रक कोल्हापूरहून बोरपाडळेच्या दिशेने जात असताना ट्रक व मोटारसायकलचा अपघात झाला. यावेळी मोटारसायकलस्वाराच्या पायास व इतरत्र दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी कोल्हापूरला पाठविणेत आले आहे. यावेळी ट्रकचालक पसार झाला आहे. मोटारसायकलस्वारास तत्काळ उपचारासाठी तात्काळ कोल्हापूरला हलविण्यात आल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. या अपघातामुळे घाटात मोठ्या प्रमाणावर ट्रॉफीक जाम झाले होते. पोलिस कॉन्स्टेबल उदय काटकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वहातूक सुरळीत केली.