बारा दवाखान्यात उपचारासाठी विनवणी, पण प्रवेशही नाकाराला
गारगोटी/प्रतिनिधी
माणुसकीला काळीमा फासणारी व मनाला सुन्न करणारी घटना वाघापूर येथे घडली, हद्रयविकाराचा झटका आलेल्या आईला उपचारही न देता आल्याने आईचा मृत्यू मुलांना हतबल होवून पाहवा लागला.तब्बल बारा डाॅक्टरांनी उपचार लांबच पण दवाखान्यातच रूग्णाला घेतले नाही. सहा तास प्रवास करूनही ना डाॅक्टर भेटले ना उपचार भेटले.
वाघापूर ता. भुदरगड येथील सौ.शेवंता पांडुरंग आरडे वय ५८ ही दुदैर्वी आई,कोरोनाच्या संकटात डाॅक्टर सुध्दा किती निष्ठूर वागू शकतात याचे हे जिवंत उदाहरण. सर्वच रूग्णाच्याकडे कोरोना ग्रस्त म्हणून च पाहीले जातेय अगदी उपचार लांबच पण दवाखान्यात सुध्दा प्रवेश दिला जात नाही.
बुधवारी संध्याकाळी दहा वाजता सौ.शेवंता आरडे यांना हद्रयविकाराचा झटका आला गावामध्ये किरकोळ उपचार केल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना गावाजवळील तीन किलोमीटर असलेल्या मुरगूडात उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला पण मुरगूडात कोणत्याही डाॅक्टरानी अथवा दवाखान्यानी त्यांना प्रतिसाद दिला नाही त्यानंतर बिद्री साखर कारखान्यावरील दवाखान्याकडे नेण्यात आले त्यांनी उपचार करण्यास नकार दर्शविल्यानंतर आरडे कुटूंबियांनी गारगोटीत रूग्णाला हलविले.
मात्र दुदैव्याचा फेर्या येथूनच सुरू झाला रूग्णाची परिस्थिती कठीण होत असताना दवाखाने नकार देत होतं .गारगोटीतील कोणत्याही दवाखान्यात त्यांना घेतले नाही मग मात्र मुलांनी कोल्हापूर ला जाण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर कडे जात असताना कळंब्यानजीक रूग्णाची परिस्थिती अत्यंत बिकट बनली पहाटे चार पर्यंत फिरूनही एकाही दवाखान्यात रूग्णावर उपचार करण्यास नकार दिल्याने पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अगदी हसत खेळत्या माणसाची आरोग्याची काही समस्या झाली तर त्याला कोरोना म्हणूनच बघण्याची सवय समाज्याची बनली आहे विशेष म्हणजे त्यात डाॅक्टर ही सामील झाले आहेत.