प्रतिनिधी / चिपळूण
चिपळूण तालुक्यातील वाघिवरे मोहल्ला येथे गोवंश हत्या करताना पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडले. गोवंश हत्या होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले असता चौघेजण जनावर कापत सताना रंगेहाथ सापडले. या चौघांना साहित्यासह अटक करण्यात आले.