वार्ताहर / बिबी
वाघोशी ता. फलटण येथे अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी करून 4 लाख 23 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रोजी 11.30 ते मंगळवार दि. 18 रोजी 4.30 वाजण्याच्या सुमारास वाघोशी ता. फलटण येथील अविनाश यशवंत शिंदे (वय 45) यांच्या राहत्या बंद घराचा दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरटय़ांनी घरामधील पत्र्याच्या कपाटाचा दरवाजा उचकटून 4 लाख 18 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व अविनाश शिंदे यांच्या घराशेजारी राहणाया हणमंत गुलाबराव पवार यांच्या बंद घरातील 5 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरटय़ांनी चोरुन नेल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल केला आला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.