मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी पारनेर येथे मेहबूब शेख यांनी निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेवरुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. शेख यांनी लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे असंही ते म्हणाले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या टीकेला भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. मेहबूब शेख यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही अशा शब्दांत उत्तर दिलं आहे. चित्रा वाध यांनी ट्विट केलं असून सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले; आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू असल्याचा आरोप केला आहे.
चित्र वाघ यांनी मेहबूब शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना “वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकत आहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी टीकेला उत्तर दिलं आहे.
नवऱ्याची नार्को टेस्ट करायला मी तयार
चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना आव्हान करत म्हटंले आहे की, माझ्या नवऱ्याची नार्को टेस्ट करायला मी तयार आहे. जो मेहबूब शेख माझ्यावर आज आरोप करतोय त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याने अगोदर 376 चा गुन्हा कशाला म्हणतात, याची माहिती घ्यावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहे.