मुंबई
आईसक्रीमच्या क्षेत्रात नाव कमावलेल्या वाडीलालने येणाऱया काळात 800 कोटींच्या आईसक्रीम विक्रीचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे समजते. सदरचे उद्दिष्ट आर्थिक वर्षात साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सध्या या व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. लॉकडाऊनचा अंमल झाल्यास पुन्हा विक्रीवर संक्रांत कोसळेल, अशी भीतीही कंपनीने व्यक्त केली आहे. उन्हाळय़ात आईसक्रीमची मागणी मोठय़ा प्रमाणात असते. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये वाडीलालने 650 कोटींच्या आईसक्रीमची विक्री केली आहे. गेल्या तिमाहीत आईसक्रीमला चांगली मागणी दिसली आहे. ही मागणी पाहता वरील उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल, असे कंपनीला वाटते.