चीनमध्ये प्रतिव्यक्ती कर्जाचा आकडा अधिक: भारतापेक्षा बांगलादेश चांगल्या स्थितीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीदरम्यान जगभरातील अर्थव्यवस्था प्रतिकूल स्थितीतून वाटचाल करत आहेत. एकीकडे उत्पन्नात मोठी घट झाली असून दुसरीकडे आरोग्यविषयक सुविधा वाढविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. यामुळे सरकारांवरील विदेशी कर्ज वाढले आहे. भारत आणि शेजारी देशांची तुलना केल्यास चीन सर्वाधिक कर्जात आहे. तर बांगलादेशवरील कर्ज सर्वात कमी आहे. दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या पाकिस्तानवरील कर्जाची समस्या आता विक्राळ होत चालली आहे.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार इम्रान खान सरकारच्या कार्यकाळात 20.7 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांचे नवे कर्ज घेण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तानवरील एकूण कर्ज पहिल्यांदाच 50.5 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. डॉलर्समध्ये ही रक्कम सुमारे 283 अब्ज डॉलर्स इतकी आहे. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या सध्या 22 कोटी 71 लागा 41 हजार 523 इतकी आहे. यानुसार पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकावर सुमारे 1230.5 डॉलर्सच्या कर्जाचा भार आहे.
भारतीयावर 407 डॉलर्सचे कर्ज
भारताची एकूण लोकसंख्या 139 कोटी 97 लाखांवर आहे. मार्च 2021 मध्ये समाप्त आथिंक वर्षानंतर भारतावरील विदेशी कर्ज 570 अब्ज डॉलर्सचे आहे. कोरोना संकटात गेलेल्या आर्थिक वर्षात हे कर्ज 11.6 अब्ज डॉलर्सने वाढले आहे. अशाप्रकारे प्रत्येक भारतीयावर 40.7 डॉलर्सचा कर्जाचा भार आहे.
चिनी नागरिकावर उच्चांकी कर्ज
जीडीपी आकाराच्या हिशेबाने जगातील दुसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनची कर्जाप्रकरणीची स्थिती फारशी चांगली नाही. चीनवरील एकूण कर्ज 13 हजार अब्ज डॉलर्सच्या उच्चांकी स्तरावर आहे. मागील काही दशकात चीनने आर्थिक स्वरुपात मोठी प्रगती केली असली तीरही त्याच्यावरील कर्जही प्रचंड वाढले आहे. कम्युनिस्ट शासनाच्या प्रयत्नानंतरही हे कर्ज नियंत्रित होताना दिसून येत नाही. चीनच्या प्रत्येक नागरिकावर यानुसार 8971 डॉलर्सच्या कर्जाचा भार येतो.
बांगलादेशची स्थिती बरी
एकूण देयकासोबत प्रतिव्यक्ती कर्जाप्रकरणी बांगलादेशची स्थिती अन्य शेजारी देशांपेक्षा चांगली आहे. बांगलादेशची लोकसंख्या सध्या 16 कोटी इतकी असून एकूण कर्ज 45 अब्ज डॉलर्स आहे. यानुसार बांगलादेशच्या प्रत्येक नागरिकावर केवळ 264.70 डॉलर्सचा सरासरी कर्जाचा भार आहे. भारताच्या तुलनेत हा आकडा जवळपास निम्मा आहे.