नवीन व्यापारी वर्षासाठीचा इक्राचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक पातळीवरील मजबुत होणाऱया किमतींमुळे ऑक्टोबरपासून सुरु होणारे व्यापारी वर्ष 2021-22 साठी सरकारची सबसिडी न घेताही भारतामधील साखर निर्यात वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती आयसीआरए एजन्सी (इक्रा)यांनी दिली आहे.
मागील दोन वर्षांपासून सरकारी सबसिडीसोबत फक्त काही प्रमाणात साखरेची अनिवार्य रुपात निर्यात केली आहे. व्यापारी वर्ष 2020-21 (सप्टेंबर-ऑक्टोबर) या कालावधीदरम्यान 60 लाख टन निर्यात साठा निश्चित केला आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांनी आतापर्यंत 90 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सेदारीची निर्यात केली आहे.
आंतरराष्ट्रीय कच्च्या साखरेच्या किमतीमध्ये वृद्धी होत आहे. ऑगस्टमध्ये ही किमत 430 डॉलर प्रति टन झाली आहे. आगामी साखर सत्रात साखर निर्यातीचा अंदाज सकारात्मक राहण्यासोबत तेजी राहणार असल्याची माहिती आहे. यामुळे कच्च्या साखरेच्या किमतीमध्ये वृद्धीनंतर मागील चार वर्षांमध्ये ही किमत उच्चांकी पातळीवर राहिली आहे.
जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश ब्राझीलकडून प्राप्त साखर उत्पादनाच्या आकडेवारीनुसार चालू सत्रात देशाचे साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता सांगितली जात आहे.