बेंगळूरप्रतिनिधी
राज्यातील सिंथेटिक ड्रग्जच्या वाढत्या घटना राज्य पोलिसांसाठी एक मोठे आव्हान आहे, असे राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हंटले आहे. बुधवारी म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना बोम्माई म्हणाले, राज्यात मादक पदार्थांची विक्री आणि सेवन करण्याविषयीची प्रकरणे सर्रासपणे सुरू आहेत आणि या प्रकरणातील बहुसंख्य आरोपी हे परदेशी आहेत. “गेल्या वर्षी पोलिसांनी कृत्रिम मादक द्रव्यांच्या खरेदीप्रकरणी १५-२० परदेशी लोकांना अटक केली,” असे त्याने सांगितले.
दरम्यान, कोरोना लॉकडाऊन नियम शिथिल झाल्यांनतर म्हैसूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, असेही बोम्माई म्हणाले. तसेच शहरात चेन स्नॅचिंगची प्रकरणे काही मोजकीच होती, परंतु आता ग्रामीण म्हैसूरमध्ये साखळी स्नॅचर्स सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.