आणखी साडेचारशे प्रवासी मायदेशी : ‘गंगा’ मोहीम अंतिम टप्प्यात
रशियाकडून युक्रेनमध्ये बॉम्बवर्षाव तीव्र, कीव्ह शहराला पूर्णपणे घेरण्याची तयारी
कीव्ह / वृत्तसंस्था
रशिया-युपेन युद्धाच्या सोळाव्या दिवशी रशियाने शुक्रवारी आपले आक्रमण वाढवल्याचे दिसून आले. युपेनमधील अनेक शहरांवर प्राणघातक बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. रशियन सैन्य आता कीव्हच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. दरम्यान, युद्धामुळे अडीच लाख लोकांनी युपेन सोडल्याचा दावा ‘यूएन’ने केला आहे. त्याचबरोबर युपेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांची सुटका केली जात आहे. शुक्रवारीही युपेनमध्ये अडकलेल्या जवळपास साडेचारशे नागरिकांना विशेष विमानाने भारतात आणण्यात आले.
भारत सरकारचे ‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात असून ते अजूनही वेगाने काम करत आहे. शुक्रवारी युपेनमध्ये अडकलेल्या 200 भारतीय नागरिकांना विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले. याआधीही पोलंडहून 242 भारतीयांना घेऊन एक विशेष विमान परतले होते. रशियाने शुक्रवारी युपेनपासून रशियापर्यंत दैनंदिन मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आता दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत लोक युपेनमधून रशिया सुरक्षित कॉरिडॉरमधून जाऊ शकतील. दुसरीकडे युपेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर मारियुपोलमधील सुरक्षित कॉरिडॉरवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दोन दिवसांत आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
रशियन ‘स्वयंसेवक’ रणांगणात
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युपेनमधील रशियाच्या युद्धात सामील होण्यासाठी मध्य पूर्व आणि इतर ठिकाणांहून ‘स्वयंसेवक’ सैनिक आणण्यास मान्यता दिली आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी रशियासोबतचे सामान्य व्यापारी संबंध संपुष्टात आणण्याची घोषणा करतील. यासोबतच अमेरिका युरोपियन युनियन आणि जी-7 देशांमध्ये सामील होऊन रशियासोबतच्या व्यापारातील ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’चा दर्जाही काढून घेण्याचा इशारा दिला. अमेरिकेचे हे पाऊल युद्ध संपवण्यासाठी पुतीन यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.