बेंगळूर, म्हैसूर, नाशिक, ठाणे, हैद्राबाद शहरांकडे धावताहेत बसेस
प्रतिनिधी/ बेळगाव
दैनंदिन बससेवेबरोबर वातानुकूलित लांब पल्ल्याची बससेवा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर झाला आहे. बेळगाव आगारातून दररोज रात्री बेंगळूर, म्हैसूर, नाशिक, ठाणे, हैदाबाद, तिरुपती आदी शहरांकडे वातानुकूलित बससेवा सुरू आहे.
गतवषी कोरोनामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला होता. आंतरराज्य व राज्यांतर्गत बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी धावणाऱया वातानुकूलित बससेवेवरही परिणाम झाला होता. मात्र अनलॉकनंतर स्थानिक बससेवेबरोबर लांब पल्ल्याच्या गाडय़ादेखील सुरळीत सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद थोडा कमी असला तरी कर्नाटक व हैद्राबादमध्ये राहणाऱया वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकात आगाऊ तिकीट आरक्षणही सुरू आहे. यालाही प्रतिसाद वाढत आहे. पुणे, बेंगळूर, मुंबई, हैद्राबाद या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी रात्रीच्या धावणाऱया वातानुकूलित बससेवेला प्राधान्य देतात.