कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने धास्ती ही वाढली
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला आहे. पारा घसरल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. यामुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. दवाखानेही गर्दीने फुलून गेले आहेत.
बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांच्या कडकडाटासह, पडणाऱया पावसाने वातावरणात कमालीचा बदल केला. गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाऊस पडणार असा अंदाज लावला जात होता. ऊनाची तीव्रता कमी होवून गारठा वाढला. गुरूवारी पारा 26 अशांवर आला होता. या गारठय़ापासून बचावासाठी सर्वांनी उबदार कपडे परिधान करण्यात आले. तरीही ही बोचणारी थंडी त्रासदायक ठरत आहे. थंडीचा जोर वाढल्याने सर्दी, खोकला, ताप आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. दवाखान्यात रांगा लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भावही वाढला आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून ही नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. गरम पदार्थ, कोमट पाणी, थंड, आंबट, तळलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.