प्रतिनिधी/ मंडणगड
निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मंडणगड व रायगडमधील 1000 कुटुंबांना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पोकळे व पराग गुजराथी यांनी कार्यकर्त्यांसमवेत अन्नधान्य किटचे वाटप केले.
यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, सिंहगड रस्ता पत्रकार व फुड डोनेन, अखिल भारतीय दानमो गुजराथी समाज, सिंहगड टेकर्स आदी संघटनांनी सहकार्य केले. यामध्ये आंबडवे, शिगवण, आंबवणे खुर्द, घोसाळे, किंजळघर, शेवरे, चिचघर, कळकवणेमध्ये 800 धान्य कीट, मेणबत्त्या यांचे वाटप करण्यात आले. तसेच रायगडच्या पायथ्याची असलेल्या 200 कुटुंबांना अन्न-धान्य कीट व गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मदतकार्यात राकेश बाफना, पराग गुजराती, हेमंत उत्तेकर, पत्रकार प्रकाश यादव, नारायण श्रीमंत देवकर शास्त्राr, किरण खंडागळे, जनकल्याण समितीचे जिल्हा सहकार्यवाह सचिन शेठ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे चेअरमन विश्वदास लोखंडे, मुख्याध्यापक भास्कर जायभाये, लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयाचे प्रा. ज्ञानदेव गीते, प्रदीप जाधव, वैभव नारकर, हेमंत भागवत, श्रीपाद गोविलकर, पुरुषोत्तम कर्वे आदी सहभागी झाले होते….