मच्छीमार, महिलांनी मोठय़ा प्रमाणात केले गोळा
मालवण:
तौक्ते चक्रीवादळानंतर मंगळवारी सकाळी ओहोटीवेळी शहरातील दांडी समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात शिणाणे शिंपले सापडले. स्थानिक मच्छीमार व महिलांनी मोठय़ा प्रमाणात हे शिंपले गोळा केले.
तौक्ते चक्रीवादळाचा किनारपट्टीला जबरदस्त तडाखा बसला असून दोन दिवस मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. मंगळवारी सकाळी किनाऱयावर शिणाणेसारखे शिंपले सापडू लागल्याने मच्छीमार व महिलांची पावले किनाऱयावर वळू लागली. भराभर सर्वजण शिणाणे गोळा करू लागले. जवळपास अडीच तास हे काम सुरू होते. या शिंपल्यांना बाजारात खरेदीसही चांगला प्रतिसाद मिळाला.
शिणाण्यांविषयीची माहिती
या शिंपल्यांना स्थानिक मच्छीमार शिणाणे असेच संबोधत होते. समुद्रातील खडकांवर बहुतेक त्यांची वाढ होते. परंतु चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे ते खडकांमधून तुटून किनाऱयावर आले असावेत. यातील काही शिणाणे हे पूर्णत: तयार झालेले दिसत नाहीत. त्यामुळे ते वादळाबरोबर तुटून आले असावेत, असे मच्छीमार म्हणाले. या शिणाण्यांमधील मासांचे खमंग तिखले बनविणार असल्याचा बेत मच्छीमारांनी बोलून दाखविला. दरम्यान, या शिणाण्यांची शास्त्राrय माहिती जाणून घेतली असता, या शिंपल्यांना शिणाणे म्हणायचे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. या शिंपल्यांच्या टोकाचा भाग लेखणीच्या टोकासारखा असल्याने त्याला ‘पेन शेल’ असे म्हणतात. त्याचे शास्त्राrय नाव ‘पिन्ना केरस’ असून इंग्रजी नाव अंबर पेन असे आहे. या शिंपल्यांची वाढ समुद्रातील रेतीतच होते. मालवणात त्याच्या वाढीस पोषक वातावरण असल्यानेच ते सापडले असावेत, असे सागरी अभ्यासकांनी सांगितले.