प्रतिनिधी / पेडणे
पेडणे तालुक्मयात रविवारी झालेल्या वादळात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी आणि रविवारी तौक्ते वादळाने पेडणे तालुक्मयात सर्वत्र मालमत्तेची मोठय़ा प्रमाणात हानी झाली. झाडे मोडून , उन्मळून पडल्याने तसेच वीज वाहिन्यावर पडल्याने मोठय़ा प्रमाणात सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले.
तालुक्मयात रस्त्यावर दगड , माती तसेच झाडे मोडून पडल्याने आणि वीज वाहिन्या तुटल्याने पेडणे तालुक्मयात बत्ती गुल झाली. संपूर्ण तालुक्मयात वीज पुरवठा खंडित झाला. सरकारी यंञणेने तसेच पेडणे अग्निशामक दल आणि वीज विभागाच्या कर्मचारी यांनी बरीच मेहनत घेत रस्ता मोकळा करण्याचे काम केले. यामुळे वाहतूक सुरु झाली.माञ रस्त्यावर पडलेले मोठे दगड तसेच रस्त्याच्या बाजूला पडलेली झाडे पेडणे तालुक्मयातील काही भागात तशीच पडून होती.पेडणे पालिका क्षेत्रातील प्रभाग दोन मध्ये मोठय़ा प्रमाणात झाडे पडली. वीज वाहिन्या तुटल्या होत्या आज सोमवारी या प्रभागाचे नगरसेवक मनोज हरमलकर यांनी तसेच त्यांचे मिञ नारायण हरमलकर व पञकार महादेव गवंडी यांनी वाहतुकीला आडथळा ठरत असलेले दगड तसेच झाडे बाजूला केली. नगरसेवक मनोज हरमलकर यानी आपण स्वतः झाडे , दगड बाजूला करत लोकप्रतिनिधीची भुमिका बजावली. मनोज हरमल यांनी सर्वत्र झाडे पडाल्याने सारकारी यंञणेला दोष न देता अडथळा आपणहून दूर केला. नगरसेवक मनोज हरमलकर यांनी लोकप्रतिनिधीची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे नागरिकांनी कौतुक केले.
ड़ पेठेचावाडा येथेही मोठय़ा प्रमाणात झाडे मोडून वीज वाहिन्यावर पडली होती. पेठेचावाडा येथेही पडलेल्या झाडामुळे आडथळ निर्माण झाला. ही झाडे बाजूला करण्यासाठी सरकारी यंञणेची वाट न पाहता या भागातील नागरिकांना तसेच स्थानिक पंच सदस्य वसंत देसाई , महेश साळगावकर यांनी विशेष मेहनत घेत ग्रामस्थाच्या मदतीने ही झाडे कापून रस्ता मोकळा केला.