वाळपईत घरावर झाड कोसळून 1.30 लाखाचे नुकसान : पाडेली येथे फांदी कोसळून युवक जखमी,चोर्ला घाट परिसरातील दरड हटविली
प्रतिनिधी / वाळपई
आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी वादळी वाऱयाचा फटका बसून वाळपई येथील एका घराची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. तर भोम पाडेली येथील एका युवकावर झाडाची फांदी कोसळल्याने जखमी होण्याची घटना घडली. दरम्यान, परिसरामध्ये बुधवारी रात्री काही प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. गुरुवारी सकाळपासून दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे.
बुधवारी दिवसभर सत्तरी तालुक्मयात जोरदार पाऊस लागला होता. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत बनले होते. चोर्ला घाट परिसरांत मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे गोवा बेळगाव दरम्यानच्या गोवा हद्दीत काही प्रमाणात दरडी कोसळण्याचा प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात दरडी कोसळून मोठ मोठे दगड प्रमुख रस्त्यावर आले होते. मात्र वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला नाही. रस्ता वाहतूकही सुरळीतपणे सुरू होती.
आज सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाने दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मशिनरी व्यवस्था करून संध्याकाळी उशिरापर्यंत दरडी हटवण्याचे काम सुरू होते. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्यातरी दरडी पूर्णपणे हटविण्यात आलेल्या आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा येण्याची कोणतीही शक्यता नाही. तरीसुद्धा मोठय़ा प्रमाणात पाऊस लागल्यास सदर महामार्गावरून वाहतूक करताना काही प्रमाणात सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाळपईत झाड कोसळून घराचे नुकसान
दरम्यान, वादळी वाऱयाचा फटका बसल्यामुळे आज सकाळी वाळपई पालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 3 मधील आग्नेलो जॉन फर्नांडिस (ख्रिश्चनवाडा मासोर्डे) याच्या घरावर झाड कोसळल्यामुळे सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. घराचा अर्धा भाग पूर्णपणे कोसळलेला आहे. यामुळे नुकसानीचा सुमारे 1.30 लाख होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. याची दखल घेऊन वाळपई मामलेदार कार्यालयात तलाठी तुळशीदास मांदेकर यांनी स्थानिक नगरसेवक विनोद हळदणकर यांच्यासह एकूण घटनेचा पंचनामा केला. या संदर्भात विनोद हळदणकर यांनी सांगितले की, या घटनेमुळे जवळपास 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झालेली आहे. यासंदर्भात प्रस्ताव आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत सरकारला सादर करण्यात येणार आहे. यामुळे सरकारने ताबडतोब या कुटुंबाला मदत मंजूर करावी, अशी मागणी विनोद हळदणकर यांनी केलेली आहे.
झाडाची फांदी कोसळून युवक जखमी
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पंचायत क्षेत्रातील भोम पाडेली येथील कृष्णा गावडे यांच्या घरावर झाडाची फांदी कोसळल्यामुळे तो जखमी झाला. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे उपचार सुरू आहेत. वादळी वारा सुरू झाल्यानंतर तो स्वतःचा बचाव करण्यासाठी धावत घरी जात असतानाच त्याच्यावर झाडाची फांदी कोसळली.
चोर्ला घाटमार्ग 31 डिसेंबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी जारी केलेल्या एका आदेशात गोवा कर्नाटक जोडणारा चोर्ला घाटातील महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 जुलै ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कार्यरत राहणार आहे. यामुळे या महामार्गावरून अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थानिक पोलिस यंत्रणा व उपजिल्हाधिकाऱयांना देण्यात आलेले आहेत. यामुळे 1 जुलैपासून महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी राहणार आहे.