प्रतिनिधी/ महाबळेश्वर
एस बँक आर्थिक घोटाळयातील प्रमुख संशयित असलेले उद्यागपती धीरज वाधवान व कपील वाधवान यांना सीबीआयने रविवारी महाबळेश्वर येथील त्यांच्या वाधवान हाऊस या बंगल्यातून अटक केली. न्यायालयाने 5 मेपर्यंत अटकेला स्थगिती दिली असताना सीबीआयने अचानक त्यांना ताब्यात घेतल्याने होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या वाधवान कुटंबाला जबर धक्का बसला. दरम्यान काल पासूनच या परीसरातील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती.
जिल्हा बंदी आदेश झुगारून पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात प्रवेश करणारे वाधवान कुटुंबावर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल करून त्यांना इन्स्टिटुशनल क्वारंटाईन केले होते. याच दरम्यान वाधवान कुटूंब हे महाबळेश्वर येथे दाखल झाल्याचे सीबीआयला समजले. वाधवान बंधुंना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे अधिकारी हे पाचगणी येथे दाखल झाले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने सीबीआयच्या अधिकारी यांना इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन कक्षात प्रवेश नाकरला होता. त्यामुळे क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात येई पर्यंत थांबण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता.
दरम्यान सीबीआय एस बॅक घोटाळयातील चौकशीसाठी धीरज वाधवान व कपील वाधवान यांना अटक करणार याची खात्री असल्याने वाधवान यांच्यावतीने त्यांच्या वकीलांनी न्यायालयातून अटकेला स्थगिती मिळविली होती. न्यायालयाने 5 मेपर्यंत वाधवान बंधुंना अटक करण्यास मनाई केली होती. न्यायालयाच्या निर्णयाने वाधवान बंधुंना 5 मेपर्यंत दिलास मिळाला होता. परंतु सीबीआय यांनी पुन्हा न्यायालयात अपिल केले देशातील मोठया आर्थिक घोटाळयातील वाधवान बंधु हे प्रमुख आरोपी आहेत. त्यांचा इन्स्टिटयुशनल क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात आला आहे तसेच ते ज्या महाबळेश्वर येथील बंगल्यात आहे तो बंगला पुर्णपणे घनदाट जंगलात आहे बंगल्याचा परिसर मोठा असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे दिव्य आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आल्याची माहितही सुत्रांनी दिली या सीबीआयचे म्हणणे ग्राहय धरून न्यायालयाने शनिवारी 5 मेपर्यंत अटकेला दिलेल्या स्थगिती आदेश मागे घेतला.
त्यामुळे वाधवान बंधुंच्या अटकेतील सर्व अडथळे दूर झाले. न्यायालयाने अटकेला दिलेली स्थगिती आदेश मागे घेतल्याने सीबीआयने याबाबत सातारा पोलिसांना या बाबत कळविले काल सायंकाळी महाबळेश्वर पोलिसांनी महाबळेश्वरची नाकाबंदी केली. प्रत्येक नाक्यावर तसेच येथील वाधवान हाऊस परीसरातील बंदोबस्तातही मोठी वाढ केली. वाधवान हाऊस परिसर हा घनदाट जंगलात असल्याने सातारा येथील शिघ्रकृती दलाने त्या परिसराचा ताबा घेतला जंगलात पहारा ठेवण्यात आला. सातारा पोलिसांनी बंगल्याची चोहो बाजुंनी नाकाबंदी केली होती.
बंदोबस्तावरील पोलिसांचा जीव भांडय़ात
मोठया आर्थिक घोटाळयातील प्रमख आरोपी असलेले वाधवान बंधुंच्या बंदोस्ताचा ताण सातारा जिल्हा पोलिसांवर होता. गेली अनेक दिवस त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी महाबळेश्वर पोलिस व सातारा येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकाऱयांवर होती. वाधवान यांना सीबीआयने ताब्यात घेवून मुंबईकडे रवाना झाल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा जीव भांडयात पडला. एकीकडे कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलीस व्यस्त असताना त्यांच्यावर वाधवान यांच्या बंदोबस्ताचा ताण पडला होता.