ऑनलाईन टीम / मुंबई :
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महिनाभरात 5 ते 10 कोटींचे कपडे वापरले आहेत. वानखेडे कधीही त्यांचे कपडे रिपीट करत नाहीत. ते 70 हजारांचा शर्ट, लाखाची पॅन्ट, दोन लाखांचे बूट वापरतात. एका प्रामाणिक अधिकाऱयाची जीवनशैली एवढी उच्च कशी असू शकते. याचे कारण स्पष्ट आहे की, वानखेडेंनी लाखो रुपये उकळले आहेत, असे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
मलिक म्हणाले, एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱयाचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही. पण वानखेडे मोदींपेक्षा महाग कपडे वापरतात. त्यांचे शर्ट, पॅन्ट, बूट, बेल्ट या सर्वांची किंमत 30 हजारांच्या पुढे आहे. एकदा वापरलेले कपडे वानखेडे रिपीट करत नाहीत. ते 70 हजारांचे शर्ट, लाखाची पॅन्ट वापरतात. बूट दोन-दोन लाखांचे वापरतात. त्यांच्याकडे 20 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतची घडय़ाळे आहेत. ते कमरेचा बेल्टही दोन लाखांचा वापरतात. राहणीमानाच्या बाबतीत वानखेडेंनी मोदींनाही मागे टाकले आहे. त्यांच्याकडे असलेल्या कपडय़ांची किंमत जवळपास 5 ते 10 केटींच्या घरात आहे. एका प्रामाणिक अधिकाऱयाकडे एवढे पैसे कसे असू शकतील, असा सवालही मलिकांनी उपस्थित केला आहे.