प्रतिनिधी / वेंगुर्ले:
महाराष्ट्र राज्य वीज महामंडळामध्ये 40 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावून 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले मठ येथील वायरमन दिलीप रामचंद्र कावले यांचा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा वेंगुर्लेतर्फे शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, माजी अध्यक्ष के. जी. गावडे, लोकमान्य संस्थेचे चक्रपाणी गवंडी, प्रिया करंगुटकर, स्नेहल गांवकर, सोनू कांबळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार स्नेहल गांवकर हिने मानले.