प्रतिनिधी/ सातारा
वायसी कॉलेमध्ये शिकत असणाऱया एनिमेशन सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी फी माफ होण्याबाबत प्राचार्यांना निवेदन दिले. यावेळी विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, सर्व विद्यार्थी यशवंतराव चव्हाण इंस्टिटय़ूट ऑफ सायन्स कॉलेज सातारा येथे प्रोफेशनल कोर्स (बी.एससी.एनिमेशन सायन्स) ला तिसऱया वर्षाचे शिक्षण घेत असून, विद्यार्थी भटक्या जाती, जमाती, अनुसूचित, जाती या प्रवर्गामध्ये मोडत असून विद्यार्थ्याचे एडमिशन स्कॉलरशिप मधून झाले आहे. पहिल्या वर्षी ऐडमिशन घेते वेळी विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाकडून शैक्षणिक तीनही वर्षी स्कॉलरशिप मिळेल असे सांगितले गेले. पहिल्या वर्षी स्कॉलरशिप मधून एडमिशन झाले तेव्हा वार्षिक फी 2 हजार 275 रूपये होती. दुसऱया वर्षी 2 हजार 205 रूपये होती. आणि आताचे चालु वर्ष 2020-21 हे आमचे शैक्षणिक तिसरे वर्ष असून या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्वांच्या पालकाच्ंया आर्थिक स्थितीवर ही परिणाम झाला आहे. शिक्षण विभागाकडून फी मध्ये सवलत जाहीर झाली आहे. मात्र डिपार्टमेंट स्टाफ, हेड ऑफ डिपार्टमेंट, तसेच प्राचार्य यांच्याकडून यावर्षी स्कॉलरशिप शासनाने रद्द केल्याचे सांगितले जात आहे. फक्त एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाप्रमाणे भटक्या तसेच अनुसूचित जाती जमाती, मागील 2 वर्ष स्कॉलरशिप चा लाभ घेत असलेले विद्यार्थी या सर्वांना संपूर्ण फी 25 हजार रूपये भरावी लागणार आहे. यावर विद्यार्थ्यांनी विचारपूस केली. तसेच शासकीय जीआरची मागणी केली. तेव्हा प्राचार्य आणि स्टाफ कडून उडावा उडवीची उत्तरे मिळत आहेत. याबाबत महाविद्यालयाने ठोस माहिती द्यावी अन्यथा सर्व विद्यार्थी उपोषणाला बसतील.