ऑनलाईन टीम / चंदिगढ :
भारतीय वायूदलाचे ‘मिग-21’ हे लढाऊ विमान गुरुवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाले. पंजाबच्या मोगा जिह्यातील लंगियाना खुर्द गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या अपघातात पायलट स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रशिक्षणासाठी या विमानाने राजस्थानमधील सूरतगड येथून उड्डाण केले होते. मात्र, काही वेळातच हे विमान मोगाजवळ कोसळले. हे विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले हे अद्याप समोर आले नाही. वायुसेनेने घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाला दिले आहेत.