सांबरा
वायुदल केंद्रातील कर्मचाऱयांनी श्रमदान करून केंद्रीय विद्यालय क्र. 1 समोरील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काही वर्षांपूर्वी येथील मार्गाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबविली नसल्याने दरवषी पावसाळय़ात येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचून राहते. येथेच बसथांबा असल्याने नागरिकांना व प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत होते. नजीकच शाळा असल्याने डासांचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्मयात येण्याचा संभव होता. याबाबत चार दिवसांपूर्वी ‘तरुण भारत’मध्येही सचित्र बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेऊन भारतीय वायुदल केंद्राच्या कर्मचाऱयांनी जेसीएम प्रमुख राघवेंद्र होसमनी यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान केले व पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना राबविली. श्रमदान करणाऱयांमध्ये मीरा सतीश, संगीता कांबळे, अरुण के., इ. प्रकाश, काशप्पा मादर, शशिकांत कांबळे, सुरेश दोडमनी, रवी असुंडी व आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रविराव आदींनी परिश्रम घेतले.