प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या विविध सहकारी पतसंस्था, शिक्षण संस्था, राजकारण आणि समाजकारणात मोठे योगदान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. वाय. बी. चौगुले. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालयात पार पडला.
प्रारंभी कै. वाय. बी. चौगुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा जयशंकर कालकुंद्रीकर मल्टिपर्पज सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जयशंकर कालकुंद्रीकर संस्थेचे संचालक सीताराम वेसणे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन, संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. संस्था सामाजिक बांधिलकी मानून असेच कार्यक्रम यापुढेही आयोजित करणार असल्याचे सांगितले. जयशंकर कालकुंद्रीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या संस्थेचे संस्थापक वाय. बी. चौगुले हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक होते असे ते म्हणाले.
यावेळी मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर म्हणाले, सहकारमहषी वाय. बी. चौगुले हे फक्त शिक्षक नव्हते तर सर्वांसाठी एक पेरणास्थान होते. त्यांनी अनेक संस्था उभ्या करून कित्येक युवकांना नोकऱया दिल्या अनेकांची घरे उभी केली.
यावेळी मनोहरराव कालकुंद्रीकर, शिवाजी विद्यालयाचे एम. बी. बाचीकर आणि शामराव पाटील यांनी वाय. बी. चौगुले यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सीताराम वेसणे यांनी केले. सुधीर नेसरीकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, स्नेहलता चौगुले, मानसी चौगुले, सदस्य दयानंद उगाडे, विलास बेडरे, रमेश मेणसे, प्रमोद पाटील, मनोहर कालकुंद्रीकर, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, पाटील सर, जयशंकर सोसायटीचे चेअरमन महादेव अनगोळकर, व्हाईस चेअरमन विक्रांत कालकुंद्रीकर, बाळू लोहार, सुधीर नेसरीकर, गुंडू कोळी, महादेव मेलगे, माजी चेअरमन ऍड. भीमा कांबळेसह सदस्य उपस्थित होते.