प्रतिनिधी / फोंडा
वारखंडे-फोंडा येथील वारखंडेकर मंडळातर्फे कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे आपली सामाजिक जबाबदारी म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
वारखंडे भागातील साधारण 175 कुटुंबाना तांदूळ, साखर, रवा, खाद्यतेल, डाळ आदी वस्तू वितरित करण्यात आल्या. वारखंडेकर मंडळाचे अध्यक्ष सुदेश नाईक, उपाध्यक्ष अंकुश नाईक, सचिव चंद्रकांत नाईक, खजिनदार मेघनाथ नाईक, सदस्य नितिन नाईक, सच्चित नाईक, सुभाष नाईक, उमेश नाईक, विवेक नाईक व इतर स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन या वस्तू वितरित केल्या. वारखंडेकर मंडळ हनुमान देवस्थानतर्फे धार्मिक कार्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच शिष्यवृत्त्या देण्यात येत असतात. मंडळाच्या या सेवेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.