उपाध्यक्षपदी प्रतापराव पाटील यांची फेरनिवड
वारणानगर / प्रतिनिधी
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (वारणानगर) यांची पहिल्यांदाच निवड झाली तर प्रतापराव बाळकृष्ण पाटील, शिगांव (ता. वाळवा) यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी व पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी होते.
येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक २१ जागेसाठी सलग पाचव्यावेळी बिनविरोध पार पडली होती. आज वारणा शेतकरी कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा झाली. आमदार डॉ.विनय कोरे यांनी वारणा कारखान्याचे अध्यक्षपद प्रथमच स्विकारले असून प्रतापराव पाटील यांना उपाध्यक्षपदाची तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
यावेळी ज्येष्ठ संचालक रावसाहेब पाटील ( भादोले ), सुभाष पाटील (नागांव ), श्रीनिवास डोईजड ( चिकुर्डे ), सुभाष पाटील ( कोडोली ), शहाजीराव पाटील (जुनेपारगांव ), डॉ. प्रताप पाटील ( ऐतवडे खुर्द ) , उदयसिंह पाटील (चावरे ), प्रदीप तोडकर ( अंबप ), किशोर पाटील ( कणेगांव ), सुभाष जाधव (घुणकी), शामराव पाटील (सागाव ) विजय धनवडे, (किणी ),काकासाहेब चव्हाण ( भेंडवडे ), रविंद्र जाधव ( बहिरेवाडी ), विजय पाटील ( मांगले ), सुभाष कणसे ( सातवे ), संदीप जाधव ( येलूर ), वैशाली पाटील (कोडोली ), रंजना पाटील (कांदे ) उपस्थीत होते.
नूतन अध्यक्ष विनय कोरे म्हणाले, “कारखान्याच्या अडचणीच्या काळात शेतकरी सभासदांनी जो आमच्यावर विश्वास टाकला त्याचे फलित म्हणून कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. या विश्वासास पात्र राहून या पूढेही कामकाज करत येत्या तीन वर्षात कारखाना कर्जमुक्त करण्याचा मानस असून त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करूया.” तसेच सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले