सांगली/प्रतिनिधी
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12.57 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 33.27 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 5.54 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 2.18 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 5.70 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 2.17 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 8.65 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 2.37 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 36.35 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे. वारणा 1000, कोयना 2100, कण्हेर 100, दूधगंगा 625, राधानगरी 1908, उरमोडी 600, तारळी 370, अलमट्टी 530. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 20.7 (45), आयर्विन पूल सांगली 6.6 (40) व अंकली पूल हरिपूर 10.2 (45.11).
धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून पडलेला पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 64 (519), धोम 18 (158), कण्हेर 14 (120), वारणा 27 (372), दूधगंगा 54 (662), राधानगरी 63 (767), उरमोडी 17 (228), तारळी 25 (229).
Previous Articleशाहूनगरात काळजी घेतली, भीती पळाली
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.