वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ( ता पन्हाळा ) येथे वारणा नदीच्या पात्रामध्ये कोरेडाग येथे बेवारस मृतदेह रविवारी मिळून आला. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह तरगत असल्याचे संजय माळी या शेतकऱ्यास दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून गणिमी कावा रेस्कू फोर्सच्या प्रदीप पाटील, सागर मोरे, विलास आरळेकर याच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला असता तो पुरुष जातीचा असून अंदाजे ३५ वर्ष वयोगटातील आहे. त्याच्या अंगावर एस. एन. अॅकॅडमी सातवे अशा नावाचा टी शर्ट असून पोलिसांनी टी शर्टच्या आधारे शोध घेणेचा प्रयत्न केला परंतु अद्याप ओळख पटण्यास यश आले नाही . पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने शोध मोहिम सुरु केली आहे .
हा मृतदेह जादा दिवस पाण्यात राहिला असल्याने मृतदेहाचा चेहरा किवा शरीरावरील अन्य खुना स्पष्ट दिसून येत नसून फक्त हाडे व कवटी आहे. चेहरा स्वप्ष्ट दिसत नसल्याने मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांच्या समोर आवाहन आहे.सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड तपास करीत आहेत