प्रतिनिधी / वारणानगर
वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी वारणा शेतकरी कार्यालयासमोरील त्यांच्या समाधीचे विधीवत पूजन वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. वारणा उद्योग व शिक्षण समुहातील संस्थातून तात्यासाहेबांच्या प्रतिमापूजन करण्यात आले.
वारणा शेतकरी कार्यालयासमोरील तात्यासाहेबांची समाधी सुशोभित करण्यात आली होती. यावेळी युवा नेते विश्वेश कोरे , जोतिरादित्य कोरे, डॉ. शरदिनी कोरे, स्नेहाताई कोरे, शुभलक्ष्मी कोरे व कुटुंबियानी व वारणा समुहातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनीही दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. यावेळी बहिरेवाडी येथील तात्यासाहेबांची प्रतिमा पालखीत ठेवून बहिरेवाडी ते वारणा नगर सहकार दिंडी काढण्यात आली यामध्ये महिलांचा सहभाग होता.वारणा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.