विनय कोरे यांचे केले अभिनंदन
वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूर विधानपरीषदेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विजयामध्ये आमदार डॉ. विनय कोरे यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी वारणानगर येथे येऊन डॉ.कोरे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.
विधानपरीषदेच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक मंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांच्यात चुरस निर्माण झाली. राज्यातील अनेक जागा बिनविरोध व्हाव्यात यासाठी महाविकास आघाडी,भाजप व मित्र पक्षांचे नेते सर्वच पातळीवर प्रयत्न करीत होते. यामध्ये कोल्हापूरच्या जागे संदर्भात विशेष लागून होते. डॉ. कोरे यांनी कोल्हापूरच्या जागेसंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून समन्वय घडविला. त्यामुळे कोल्हापूरची जागा बिनविरोध झाली आणि पुन्हा विनय कोरे हे किंग मेकर ठरले.
दोन दिवसांची सायंकाळी अचानक डॉ. डी. वाय. पाटील यांनी वारणेतील दूध संघाच्या कार्यालयास भेट दिली. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मिटींगसाठी उपस्थित असलेले माजी मंत्री आ. विनय कोरे यांचा सत्कार करुन अभिनंदन करीत आभार मानले. सावकरांशी चर्चा करून पुन्हा कोल्हापूरला रवाना झाले. कोल्हापूर विधानपरिषदेच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत घोडेबाजार होऊन सर्व सामान्य जनतेत राजकारण्यांच्या बद्दल वेगळी चर्चा व्हायच्या. या निवडणुकीत मतदार संख्या कमी असल्याने घोडेबाजार होऊन शकला असता हा थांबविण्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्याला यश आले असे मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले.