ऑनलाईन टीम / वाराणसी :
वाराणसीमध्ये शुक्रवारी 208 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आणि शनिवारी 225 मधील केवळ 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी मात्र एका दिवसात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आईएमएस बीएचयूच्या माईक्रोबायोलॉजी लॅब मधून आलेल्या रिपोर्ट नुसार, रविवारी 1 पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण 18 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
सीएमओ डॉ. बी. वी. सिंह यांनी सांगितले की, यामध्ये मुंबई आणि अन्य शहरातून आलेल्या श्रमिकांची संख्या 17 आहे. तसेच आता पर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बधितांची संख्या 148 इतकी आहे. तर आयसोलेशन वॉर्ड मध्ये 64 जण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.