हिंदू समाज सेवा संघटनेतर्फे आयोजन, मानवता हा सर्वांत मोठा धर्म : चर्चिल आलेमाव
प्रतिनिधी /फातोर्डा
मानवता हा सर्वांत मोठा धर्म आहे. आमच्या गोव्यात सर्व जाती, धर्मांचे लोक एकत्रित नांदतात. एकत्र येऊन सण साजरे करतात. मी राजकारणात असून देखील कधी स्वार्थ पाहिला नाही, तर गोरगरिबांना मदत केली. त्यांची सेवा केली. यापुढे तुमची कुठलीही समस्या असेल, तर सांगावे. देवाने जर मला ताकद दिली, तर निवडून आल्यावर मी तुमची मागणी असलेले मंदिर बांधून देईन. फक्त मला मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्या. आम्ही सर्व ख्रिस्तीधर्मिय व मुस्लिम देखील हिंदू समाज सेवा संघटनेबरोबर आहोत, असे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.
वार्का येथील हिंदू समाज सेवा संघटनेच्या वार्षिक सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा आणि बालआनंद मेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून काणकोण येथील मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. पूर्णानंद च्यारी, संघटनेचे अध्यक्ष अनिल बांदोडकर, सचिव मिलिंद च्यारी, खजिनदार दामोदर बांदोडकर व इतर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. च्यारी म्हणाले की, आम्हा सर्वांना एकत्र येण्यासाठी काही तरी निमित्त हवे असते. पशू-पक्ष्यांना देखील एकत्र येण्यासाठी निमित्त हवे असते. आम्ही तर माणसे आहोत. आम्ही स्वप्ने पाहतो, विचार करतो, कष्ट करतो, संघर्ष करतो, जिद्दीने वावरतो. सध्या व्हॉट्सऍपसारखी समाजमाध्यमे एकत्र येण्यासाठी निमित्त ठरली आहेत. आज जीवनशैली बदलली आहे. घरगुती खाणाऐवजी पिझ्झासारख्या पदार्थांना प्राधान्य दिले जाते. गावातील फुगडी, धालोसारख्या कला बंद होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात फक्त गोव्यातील मंदिरांसमोर व्यासपीठ असते. या व्यासपीठांवरून अनेक कलाकार घडले, अनेक संस्था घडल्या. हे आता कमी होत चालले आहे. पण आम्ही मानवतेचे काम करणारे श्रद्धाळू आहोत, सर्व धर्म समान मानतो, असे ते म्हणाले.
मान्यवर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
संघटनेच्या हितचिंतक वर्षा नायक यांनीही विचार मांडले. ?यावेळी ज्ये÷ नागरिक आनंद बांदोडकर, सीताबाई च्यारी, दास च्यारी, मंदा बांदोडकर आणि माजी शिक्षक वर्षा नायक, पुरुषोत्तम नायक, हेमंत बांदोडकर, पंढरीनाथ चोडणकर तसेच हार्मोनियमवादक दामोदर च्यारी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. काही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये सिद्धी बांदोडकर, मोनाली साळकर, साईश वेर्लेकर, सायली च्यारी यांचा समावेश होता.
सांस्कृतिक कार्यक्रमात श्रद्धा नाईक, नित्यानंद च्यारी यांनी भाग घेतला. तसेच नृत्याच्या कार्यक्रमातील ओम च्यारी, लाव्या च्यारी, साईश शणै, गार्गी सरदेसाई, बालविका बांदोडकर, सार्थक च्यारी, पूर्वा च्यारी, वेदिका बनसोडे, तर गीतगायन कार्यक्रमातील श्रद्धा च्यारी, साईली च्यारी, शिव च्यारी, यश चोडणकर, इरफान शेख यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्वयंसाहाय्य गटाच्या साईशा शणै आणि गार्गी सरदेसाई तसेच नीलिमा सरदेसाई, विनंती खोलकर, नमिता च्यारी, सुवर्णा शणै यांनी कार्यक्रमात भाग घेतला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे हेमंत बांदोडकर, पांडुरंग मळकर्णेकर, समिरा च्यारी, सुवर्णा शणै, नीलिमा सरदेसाई, विनंती खोलकर, विठ्ठलदास वेर्लेकर, महेंद्र च्यारी, दिलीप चोडणकर, इंदुमती बांदोडकर, जयश्री गावडे यांनी परिश्रम घेतले. अनिल बांदोडकर यांनी स्वागत केले, मिलिंद च्यारी यांनी अहवाल सादर केला, सूत्रसंचालन रचना बांदोडकर यांनी केले, तर ग्रिशा बांदोडकर यांनी त्यांना सहकार्य केले. आभार दामोदर बांदोडकर यांनी मानले.