मुंबई : वार्डविजार्ड इनोवेशन्स ऍण्ड मोबिलिटीने जानेवारी महिन्यात 3,951 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. मागील वर्षात समान कालावधीत कंपनीची विक्री मात्र 129 इतकी झाली होती. वार्डविजार्ड ‘जॉय ई-बाईक’ ब्रँड नावाने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत आहे.
गुजरातच्या या कंपनीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात पहिल्या दहा महिन्यात ई दुचाकीची विक्री 21,327 इतकी केली आहे. कंपनीने मार्च पर्यंत 30,000 वाहनांची विक्री करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
आम्ही आमच्या सध्याच्या बाजाराचा विस्तार करण्यासाठी खुप उत्साही असून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढविण्यासोबत आमची महिन्याची विक्री सलगपणे वाढत असल्याचेही समाधान कंपनीचे इनोवेशन्स ऍण्ड मोबिलिटीचे मुख्य अधिकारी शीतल भालेराव यांनी म्हटले आहे.