नवी दिल्ली
भारतातील दोन तृतियांश कंपन्यांनी आता प्रगती साधण्यास सुरूवात केली असून 2022 मध्ये वार्षिक वेतनात 8.6 टक्के इतकी वाढ होऊ शकते, असा अंदाज डेलोटी या संस्थेने वर्तवला आहे.
78 कंपन्यांनी आता नव्याने उमेदवारांची भरती करायला सुरूवात केली आहे. सदरच्या सर्व्हेक्षणात 25 टक्के कंपन्यांनी दुप्पट वेतन वाढीचे आश्वासन दिले आहे. एकंदर 2022 मध्ये 8.6 टक्के इतकी वेतनात वाढ वार्षिक तत्वावर होणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.