आणखी काहीजणांना होणार अटक
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे वालरस प्राण्याच्या सुळ्य़ांच्या तस्करीत आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याचे समोर आले आह़े अंटार्टीका समुद्रकिनारी आढळणाऱया वालरसाची शिकार नेमकी कुणी केली, रत्नागिरीच्या लोकांपर्यंत ते कसे संपर्कात आले, कुणामार्फत ही तस्करी होत होती व कुणाला विकण्यात येणार होते, या बाबत मात्र गूढ कायम आह़े या प्रकरणात तस्करांची साखळी असण्याची शक्यता असून अन्य संशयितांच्या अटकेनंतरच अधिक खुलासा होण्याची शक्यता आह़े
या बाबत रत्नागिरी वनविभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी तपास काम चालू असल्याने कोणतीही माहिती उघड करण्यास नकार दिल़ा 31 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर वालरस तस्करीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होत़ी मुहंमद नुमान यासिन नाईक (42, रा. गोवा), हेमंत सुरेश कांडर (38, रा. बावशी ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग), राजन दयाळ पांगे (58, रा. पारवाडी आचरे ता. मालवण जि. सिंधुदुर्ग) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत़ वनविभागासमोर तिनही संशयितांनी आपला गुन्हा कबुल केल्याची सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली आह़े
वालरस या प्राण्याची शिकार मुख्यत्वे मांस, त्वचा, सुळे, हाडं, चरबी यासाठी करण्यात येत़े आंतरराष्ट्रीय स्तरावर या सर्व गोष्टींना मोठी मागणी आह़े तसेच कोटय़वधी रूपयांची किंमतही याला मिळत असत़े यापूर्वी रत्नागिरीत मांडूळ जातीचे साप, भारतीय वन्यप्राण्यांची कातडी, दात, पेंगुलीन आदींच्या तस्करीचे प्रकार पहावयास मिळत होत़े मात्र वालरसच्या सुळे तस्करीचा हा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आह़े आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े प्राथमिक तपास वनविभागाला काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचीही मदत वनविभागाकडून घेण्यात येत आह़े ताब्यात घेतलेल्या संशयितांना हे सुळे वाहतूक करण्यासाठी नेमके किती रूपये मिळाले होते, कुणाला ते देणार होते, या बाबत वनविभागाकडून माहिती गुप्त ठेवण्यात येत आह़े
वालरसचे सुळे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार
संशयित आरोपींकडून जप्त करण्यात आलेले सुळे हे वालरस प्राण्याचेच असल्याचे तपासणी करण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेत शिकार करण्यात आलेल्या वालरस या प्राण्याचे वय व इतर माहिती प्राप्त होण्याची शक्यता आह़े