वैभव नाईक यांनी घेतला नेरुरचा कोविड आढावा
वार्ताहर / नेरुर:
नेरुर गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेरुर गावाच्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांची कोविड टेस्ट करण्याची सूचना त्यांनी केली. औषध पुरवठा आणि एकूण आरोग्य व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेत कोविड उपाययोजनांबाबत आवश्यक सूचना केल्या. तसेच नाईक यांच्या माध्यमातून प्रा. आ. केंद्रासाठी एक ऑक्सिजन कॉन्सन्टेटर देण्यात आला.
त्याचबरोबर नेरुर हायस्कूल येथे ग्रा. पं. च्या माध्यमातून ग्राम विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथेही नाईक यांनी भेट देऊन कक्षात उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली व आवश्यक सूचना केल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा शिंगटे, डॉ. कविता पराडकर, पर्यवेक्षक भाऊ हडकर, आरोग्य सहाय्यिका अनुजा प्रभूखानोलकर, फार्मासिस्ट चंदन फोंडेकर, अतुल बंगे, उपसरपंच समद मुजावर, माजी सरपंच प्रसाद पोईपकर, मंजुनाथ फडके, प्रवीण नेरुरकर, अमोल शृंगारे, मीतेश वालावलकर, प्रसाद प्रभू, रवी गावडे, नितीन नेरुरकर, संतोष मुणगेकर आदी उपस्थित होते.