वार्ताहर/ जमखंडी
वाल्मिकी समाजाला 7.5 टक्के आरक्षण द्यावे. या मागणीचे निवेदन जमखंडी तालुका वाल्मिकी समाजातर्फे तालुकाध्यक्ष गंगाधर मरदानी यांनी येथील मिनी विधानसौधमध्ये ग्रेड-2 तहसीलदार ए. के. इंडिकर यांना दिले. परिशिष्ट समाजाला केंद्र सरकार 7.5 टक्के आरक्षण देत असून त्याप्रमाणे राज्य सरकारनेही आरक्षण द्यावे. सध्या केवळ 3 टक्के आरक्षण देण्यात आले असून यामुळे समाजातील विद्यार्थी सुविधांपासून वंचित होत असल्याचा आरोप करण्यात आला. याप्रसंगी परसाप्पा नायक, रामण्णा चिनगुंडी, पवाडेप्पा रामताळ, अंबरीश गुडदार, रवी नाटिकार, राजू गुब्बी, हणमंत मुत्तलगेरी, शिवानंद सकानट्टी, नागाप्पा तळवार, हणमंत मस्की, प्रदीप सिंगारी आदी उपस्थित होते.