‘आप’ चे राज्यप्रमुख राहुल म्हांबरे यांची मागणी : आरोग्यखाते नोकर भरतीत घोळ
प्रतिनिधी /म्हापसा
येथील जिल्हा इस्पितळात रविवार दि. 2 रोजी 300 युवक फ्ढिटनेस सर्टिफ्ढिकेटसाठी आले होते. त्यात वाळपई वगळता अन्य कुठल्याही मतदारसंघातील नव्हते. नोकर भरतीतील हा एक घोळ असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालून वाळपईतीलच युवकांना नोकऱया देणाऱया आरोग्यमंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रमुख राहूल म्हांबरे यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळाबाहेर पत्रकारांशी बोलताना केली.
आरोग्यमंत्रीपद हे केवळ वाळपई मतदारसंघापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण राज्याचे आहे. वाळपईतील युवकांना मोठय़ा प्रमाणात नोकऱया दिल्या जातात. इतर मतदारसंघातील युवकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हापसा मतदारसंघात युवक नाहीत काय, त्यांच्यात नोकऱयांची क्षमता नाही का ? म्हापशाचे आमदार याबाबत गप्प का ? ते भजपचे नाहीत काय ? चौकशी केली असता आरोग्यखात्यात नोकऱयांसाठी 10 ते 15 लाख रुपये वसुल केले आहेत. फ्ढिटनेस सर्टिफ्ढिकेटसाठी आलेल्या युवकांसोबत आरोग्यमंत्र्याचे स्विय सचिव उपस्थित होते. यामुळे नोकर भरतीत घोटाळा झाल्याचे †िदसून येत असल्याचे म्हांबरे म्हणाले.
आरोग्यखात्यात नोकऱया देताना वाळपईतील युवकांची निवड होत असेल तर मुख्यमंत्री व म्हापसा तसेच इतर मतदारसंघातील आमदारांनी दखल घेण्याची गरज आहे. याची दखल लोक तर घेणारच कारण इतर मतदारसंघानी कोणते पाप केले आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत त्या सर्वांना पात्रतेनुसार नोकरी दिलीच पाहिजे, असे म्हांबरे म्हणाले.
म्हापसावासियांत कमी शिकलेले तरूण नाहीत. वाळपईचे युवक म्हापशात येउढन फ्ढिटनेस सर्टिफ्ढिकेट करतात. म्हापशतील युवकांना नोकऱया का नाहीत असा प्रश्न आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी उपस्थित करायला हवा होता. तीच पावले उचलण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत. म्हापशात निस्वार्थी सर्वांची कामे करणारा आमदार आता निवडून आणण्याची वेळ आली आहे, असे राहुल म्हांबरे म्हणाले.
नोकरीसाठी योग्य असे अनेक उमेदवार म्हापशात असून त्यांची यादी आपल्याकडे आहे. आमदार ज्योशुआ †िडसोझा यांनी आरोग्यमंत्री राणे यांना म्हापशतील युवकांना नोकऱया का नाहीत असा प्रश्न विचारायला हवा होता. तसेच काँग्रेस नेत्यांनीही याबाबत जाब विचारायला हवा, असे म्हांबरे म्हणाले.
कामे करणाऱया उमेदवारांना निवडा
आगामी विधनसभा निवडणूकीत अशा मंत्र्यांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे. काम केलेल्या उमेदवारांनाच निवडून दया, असे सांगण्याचे धाडस म्हापशाच्या आमदारामध्ये आहे काय ? परीक्षा जवळ आली की हे अभ्यास करायला जातात. तारनदीचा पूल बांधण्याची गरज काय होती ? म्हापशाच्या बसस्थानकाची काय वाट लागलेली आहे ते प्रथम सुधारा, असे म्हांबरे म्हणाले.