नागरिकांत चर्चेचा विषय.
वाळपई प्रतिनिधी
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री उशिरा पोलीस खात्याच्या अनेक वाहनाने वाळपईत गस्त घालून लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले .अचानकपणे मोठय़ा प्रमाणात दाखल झालेल्या वाहनांच्या ताप्यामुळे नागरिकांत एकच चर्चेचा विषय ठरला होता. रात्री नऊ उत्तर गोवा पोलीस अधिक्षक याच्या मार्गदर्शानाखाली
8.30 वा. सुमारास डिचोली पोलीस स्थानकाचे उपाधिक्षक गुरुदास गावडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संजय दळवी वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर व इतर अनेक वाहनाने सायरन वाजून वाळपई परिसर होंडा परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात गस्त घातली .त्यामुळे नागरिकांत वेगळय़ाच प्रकारची चर्चा सुरू झाली होती.
याबाबतची माहिती अशी की सध्या करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने पूर्णपणे लाँकडाऊन करण्यात आलेले आहे. यामुळे घरातील नागरिकांनी बाजारात फिरून गर्दी करू नये अशा प्रकारचे आवाहन वारंवारपणे करण्यात येत आहे .याची दखल घेत आज पोलिस खात्याच्या जवळपास वीस वाहनाने वाळपई शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात गस्त घालून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. अचानकपणे वाळपई होंडा परिसरामध्ये पोलीस स्थानकाचे मोठय़ा प्रमाणात वाहने दाखल झाल्याची वार्ता नागरिकात वेगवेगळय़ा प्रकारच्या चर्चांना ऊत आला. काही नागरिकांनी वाळपईत रोगाचा रुग्ण सापडला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहनांचा ताफा दाखल झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. मात्र वाळपई पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाजारात व विनाकारण घराबाहेर पडू नये अशा प्रकारचे आवाहन करण्यासाठी व या संदर्भात जनजागृती करण्याच्या अनुषंगाने मोठय़ा प्रमाणात वाहनांचा ताफा होंडा भागांमध्ये फिरवून यासंदर्भात जनजागृती केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.